शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

अंतर

- भारती पंडित

ND
पंचवीस वर्षापूर्वी लाडक्या मुलाचा वाढदिवस आई वडिलांनी हौसेने साजरा केला. मुलाच्या सर्व मित्रांना बोलावलं. मुलांना आवडणारे सर्व पदार्थ आईनं घरी बनविले. त्यांच्या आवडीच्या गाण्याच्या कैसेटस लावल्या गेम तयार केले. आनंदाने नाचू लागली सारी मुलं!

मुलगा मोठा झाला. त्याने वडिलांची एकसष्ठी साजरी केली, फक्त मुलाच्या व सुनेच्या ऑफिसची मंडळी आमंत्रित होती. दारूचे ग्लास, सिगारेटचा वास धमघमला होता. नॉनवेज पदार्थांनी टेबल भरलं होतं. आई वडिलांना न आवडणाऱ्या न मानवणाऱ्या वस्तू त्या पार्टीत होत्या. केक कापून व खाऊन झाल्यावर मुलगा हळू आवाजात आईला म्हणाला आई, आता तुम्ही दोघं आत जाऊन टी. व्ही. पाहा. आम्ही जरा बिझनेसबद्दल बोलणार आहोत.

आईच्या डोळ्यात गेली पंचवीस वर्षे तरळून गेली आणि तिला जाणवलं की पार्टी फक्त एक संधी आहे, व्यावसायिक गुंतवणुकीची.... पार्टी एक निमित्त आहे, व्यावसायिक चढा ओढीचं, आर्थिक घडा मोडीचं.... खरोखरच भावनांच व्यावसायाकरण झालं असावं.

साभार - इंदुर लेखिका संघ, इंदुर.