गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

5 मिनिटांत कसा बनवायचा आंब्याचा रस

Aam Ras Recipe Marathi
Aam Ras पिकलेला आंबा खूप पौष्टिक आहे, जाणून घ्या 5 मिनिटात आंब्याचा रस कसा बनवायचा.

साहित्य :-
500 ग्रॅम पिकलेले आंबे, 500 लिटर दूध, 1/2 वाटी मिश्रित सुकेमेवे  (काजू, बदाम, पिस्ता), 1 टीस्पून वेलची पूड, चारोळ्या, साखर चवीनुसार.
 
सर्व प्रथम सुका मेवा पाण्यात भिजवून घ्या.
 
नंतर त्यांची साले काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
 
आता पिकलेले आंबे धुवून सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवा .
 
आंब्याच्या रसात दूध, साखर घाला आणि सुकेमेवे आणि वेलची पावडर घालून चांगले मिसळा.
 
तयार रस  काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून थंड करा.
 
ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.