गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (15:57 IST)

घरातील वाळलेले फूल बनू शकतात वास्तुदोषाचे कारण

1. घरात ठेवू नये वाळलेले फूल  
घरात रोप ठेवल्याने पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. ताजे फूल घरात सजवू शकता, पण जेव्हा हे वाळायला लागतील तेव्हा त्यांना लगेचच काढून टाकायला पाहिजे. ताजे फूल जीवनाचे प्रतीक आहे आणि वाळलेले फूल मृत्यूचे सूचक असतात. त्याशिवाय फुलांना बेडरूममध्ये न ठेवता ड्रॉइंगरूममध्ये ठेवायला पाहिजे.
 
2. दक्षिण-पश्चिम दिशेत हिरवे रोप ठेवणे टाळावे    
घरात हिरवे रोप ठेवणे उत्तम मानले जाते, पण घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेत हिरवे रोप ठेवणे फारच नुकसानदायक ठरू शकत.
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेत हिरवे रोप ठेवल्याने घरातील लोकांच्या लग्नात अडचणी येतात, तसेच घरातील वैवाहिक जोडप्यांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.
 
 3. पूर्व दिशेत ठेवा लाकडाचा ड्रॅगन
फेंगशुईनुसार, ड्रॅगन उन्नती आणि सुखाचा प्रतीक असतो. घरातील पूर्व दिशेत लाकडाचा ड्रॅगन ठेवणे फारच चांगले असते. पूर्व दिशेत व बेडरूममध्ये कधीही धातूने बनलेला ड्रॅगन नाही ठेवायला पाहिजे, असे केल्याने घरात निगेटिव्ह एनर्जी पसरते आणि अडचणींना तोंड द्यावे लागते.
 
4. दक्षिण-पूर्व दिशेत लावावे नारंगी आणि लिंबाचे झाड 
नारंगी व लिंबाचे झाडं सौभाग्य व संपन्नताचे प्रतीक असतात. सोनेरी रंगाची नारंगी सोन्याची प्रतीक मानली जाते.
धन-संपत्ती मिळवण्यासाठी आपल्या बगिच्याच्या दक्षिण-पूर्व दिशेत नारंगी आणि लिंबाचे झाड लावावे. घरातील बागेत लावण्यात आलेल्या झाडांना नियमित पाणी द्यायला पाहिजे. जर ते वाळले तर घरात निगेटिव्ह एनर्जी वाढते.