शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (13:11 IST)

ज्या घरात असतात ह्या 5 वस्तू, तेथे असते नेहमी दरिद्री

पैसे कमावण्यासाठी व्यक्ती दिवस रात्र मेहनत करतो, पण बरेच प्रयत्न केले तरी जर त्याच्याजवळ पैसे टिकत नसतील आणि नेहमी घरात दरिद्री बनलेली असेल तर त्या घरात वास्तुदोष असू शकतो. वास्तू विज्ञानानुसार घरात बर्‍याच वेळा अशा काही वस्तू असतात ज्यांना आम्ही दुर्लक्ष करून जातो पण हे दुर्लक्ष नुकसान आणि समस्यांचे कारण बनून जातात.  
 
घरात कबूतरांनी घरटे बनवले असेल तर वास्तू विज्ञानानुसार हे अशुभ मानण्यात आले आहे. असे मानले जाते की घरावर फार समस्या येणार आहे म्हणून कधीही घरात कोणत्याच पक्ष्यांना घरटे बनवू देऊ नका.   
 
जर घरात मधमाश्यांच्या पोळ्या असेल तर त्याला ताबडतोड हटवून द्या. यांचे घरात असणे अशुभ सूचक असत. यामुळे बरेच मोठे अपघात होण्याची शक्यता असते.  
 
कोळ्याचे जाळे घरात लागू देऊ नये, याला देखील अशुभ मानले गेले आहे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे माणूस गोंधळून जातो आणि त्याची समस्या जास्त वाढते.  
 
घरात कधीपण तुटलेला आरसा किंवा काच ठेवू नये, जर असेल तर त्याला ताबडतोब बाहेर काढले पाहिजे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार बनलेला असतो आणि नेहमी पैशांची चणचण राहते.