testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चला फिटनेस वॉकवर...

nordic walk
रॉक कलाइंबिंग, ट्री क्लाइंबिंग, ट्रेकिंगसारख्या धाडसी खेळांची आवड वाढताना दिसतेय. त्यातच आता भर पडली आहे ती नॉर्डिक वॉकिंगची.
नॉर्डिक वॉकिंगसाठी विशिष्ट प्रकारच्या काठ्यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने चालण्यासाठी जास्त ऊर्जा वापरावी लागते. याला फिटनेस वॉकिंग असंही म्हटलं जातं. नॉर्डिक वॉकिंगच्या फायद्यांविषयी...

* चालल्यामुळे तुमचं वजन कमी होतं. फिटनेस वॉकिंगमुळे बीएमआय कमी झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. यात 40 टक्के जास्त ऊर्जा वापरली जाते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा फिटनेस वॉकिंग करणार्‍यांच्या 1200 ते 1500 कॅलरी खर्च होतात.
* नॉर्डिक वॉकिंग करताना तुमच्या सगळ्या स्नायूंचा वापर केला जातो. साधं चालण्यामुळे किंवा धावण्यामुळे स्नायूंचा वापर होत नाही. तुमचे सगळे स्नायू काम करू लागतात. पण त्यांच्यावर फार ताण पडत नाही.
* मोकळ्या हवेत चालल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि ताण कमी होतो. नॉर्डिक वॉकर्सच्या शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह जास्त चांगल्या प्रकारे सुरू राहतो.
* अशा प्रकारच्या वॉकिंगमुळे तुमची शारीरिक क्षमताही वाढते.


यावर अधिक वाचा :