1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (22:21 IST)

Vastu Tips : घर बांधणीसाठी प्लाट कसा असावा?

त्रिकोणी प्लॉट शुभ नसतो
त्रिकोणी प्लॉट शुभ असल्याचे मानण्यात येत नाही, कारण तशा प्रकारचा प्लॉट भागीदार आणि काम करणारे यांच्या वतीने अडच‍णींना निर्माण करणारा ठरू शकेल.
 
प्लॉटचा आकार चौरस असावा
उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर प्लॉट चतुष्कोणीय असेल तर त्याच्या लांबी रूंदीचे प्रमाण 10:2 असे असावे, परंतु या सीमेपलीकडे नसावे.
 
बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात
अनियमित आकार नसलेले आणि बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात, कारण त्यातून आर्थिक हानी आणि मतभेदांना खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.
 
प्लॉटची उतरण उत्तर दिशेकडे असावी
जर प्लॉट एखाद्या डोंगरी भागात असेल तर उतरण पूर्व आणि उत्तर दिशेकडे असावी. कोणताही कालवा, तलाव, नदी, झरा, विहिर, डबके प्लॉटच्या उत्तरे किंवा पूर्वेस असावे. प्लॉटच्या उत्तरेस किंवा पूर्वेस एखादा मोठा वृक्ष नसावा.