सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

ईशान्य कोपर्‍यात बेडरूम नकोच!

घराच्या ईशान्य कोपर्‍यात (उत्तर-पूर्व दिशा) बेडरूम असेल तर तिथे झोपणारी व्यक्ती जास्त झोपाळू असते. ईशान्य कोपर्‍यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या क्षेत्रात जास्त झोप घेणे म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे होय. मुळात ईशान्य दिशेच्या कोपर्‍यात बेडरूम नसावीच परंतु, असलीच तर बेडरूममध्ये जास्त वेळ घालवणे धोकादायक असते. 

आपण आपला बेडरूम मुलाला दिला असेल तर तो अतिलठ्ठ होण्याची भीती नाकारता येत नाही. परिणामी तो सुस्त व आळशी होऊन बसेल.

बेडरूम मुलीला दिला तर ती चिडचिड्या स्वभावाची आणि भांडखोर वृत्तीची होईल. एवढेच नव्हे तर तिला कमी वयातच व्याधींशी सामना करावा लागेल.

नवविवाहितासाठी ईशान्य दिशेच्या कोपर्‍यातील बेडरूम अशुभ फळ देणारे ठरू शकते. शिवाय गर्भधारणाविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. गर्भ राहिला तरी वारंवार गर्भपात होईल. या संकटापासून वाचण्यासाठी नवदाम्पत्याला कोणत्याही परिस्थितीत ईशान्य दिशेच्या कोपर्‍याला बेडरूम देऊ नये.

ईशान्य दिशेच्या कोपर्‍यात बनवलेल्या बेडरूममध्ये झोपणार्‍या दम्पतीला शारीरिक, मानसिक, आर्थिक व आध्यात्मिक अडचणींना सामोरे जावे लागेल.

ईशान्य दिशेच्या कोपर्‍यात आपण देवघर किंवा मुलांची अभ्यासाची खोली करू शकता.