शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (12:46 IST)

अरबीच्या पापड्या Arbi Papadi Recipe

साहित्य 
अरबी २५० ग्राम 
मैदा  २५० ग्राम 
चणा डाळीचे पीठ ७५० ग्राम 
हळद, मीठ, हिंग, ओवापूड, तिखट, मोयन
तळण्यासाठी गोड तेल 
 
कृती 
सर्वप्रथम अरबी स्वच्छ पाण्याने धुऊन आणि पुसून घ्या. नंतर कुकर मध्ये ५ शिट्या घेऊन उकडून घ्या. गार झाल्यावर साली काढून त्याला किसून घ्या. परातीत हे मिश्रण एकत्र करून त्यात हळद, हिंग, मीठ, तिखट, मोयन घालून मळून घ्या. यात पाणी मुळीच टाकू नये.
 
ह्या मिश्रणात डाळीचे पीठ आणि मैदा तो पर्यंत घालायचा जो पर्यंत मिश्रण घट्ट गोळा होत नाही. मिश्रण मुरण्यासाठी १ ते २ तास ठेवा. मुरल्यावर लहान लाट्या करून लाटून घ्या. पापड वाळावून घ्या. वाळल्यावर पापड तळून घ्या. स्वादिष्ट अरबीचे पापड तयार चहासोबत सर्व्ह करा.