मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (13:09 IST)

गाजर कोफ्ता करी

साहित्य : अर्धा किलो गाजर, चार टोमॅटो, एक कांदा, थोडं आलं, सहा ते सात हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, तूप आणि मीठ.

कृतीः गाजर किसून घ्या. कांदा आणि टोमॅटो चिरून बारीक तुकडे करा. एका कढईत थोडं पाणी घालून गाजर शिजवून घ्या. पाणी आटल्यावर गॅस बंद करा. गाजरात तिखट, मीठ, धनेपूड घालून कोफ्ते तयार करा. आता कढईत थोडं तेल घालून कोफ्ते तळून घ्या. त्यानंतर तेल थोडं कमी करा. उर्वरित तेलात जीरं घाला. मग कांदा परतून घ्या. मग हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं घालून परता. शेवटी टोमॅटो घालून शिजवून घ्या. थोडं तिखट, मीठ घाला.

पाणी घालून थोडं उकळून घ्या. शेवटी कोफ्ते घालून दोन मिनिटांनी गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घाला. पोळी किंवा पराठ्यासोबत खा.

मधुरा