चविष्ट दम पनीर, या प्रकारे तडका द्या, बोटं चाटत राहाल

dum panner recipe
Last Updated: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (12:19 IST)
ज्यांना पनीर हा प्रकार आवडतो त्यांना पनीर कोणत्याही रूपात खायला दिलेले नक्कीच आवडते. पण आज जी आम्ही आपल्याला रेसिपी सांगणार आहोत ती खूप खास आहे. होय, आणि या चविष्ट सुगंधित रेसिपीचे नाव आहे दम पनीर. साधारणपणे आपण पंजाबी ढाबा आणि रेस्टारेंट मध्ये ही रेसिपी खाद्य पदार्थच्या मेनू कार्डात बघतो. चला तर मग जाणून घेऊया की पंजाबी तडका लावून दम पनीर कसे बनवायचे ते....
दम पनीर बनवायला लागणारे साहित्य-
1 चमचा तेल, 4 लवंगा, 4 वेलच्या, 1 इंच दालचिनी, एका कांद्याची पेस्ट, 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 3 चमचे दही, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा काळी मिरी पूड, 3/4 चमचा जिरेपूड, 1 चमचा मीठ, 2 चमचे क्रीम, 1/4 चमचा लाल शिमला मिरची, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा गरम मसाला, 250 ग्राम पनीर, सजावटीसाठी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पान.

कृती -
सर्वप्रथम पनीर बनविण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लवंग, वेलची आणि दालचिनी घालून खमंग वास येई पर्यंत परतून घ्या. या मध्ये कांदा, आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून खमंग परतून घ्या. नंतर यात धणेपूड, जिरेपूड, काळी मिरी पूड, हळद, लाल तिखट, मीठ घालून दही मिसळा. जरा शिजवल्यावर यामध्ये पनीर आणि क्रीम सह अर्धा कप पाणी घाला. पॅनला फॉईल पेपर ने झाकून त्यावर झाकण लावून 15 मिनिटासाठी मंद आंचेवर शिजवा.

आपणास कोरडे हवे असल्यास ग्रेव्हीला अजून काही वेळ शिजवून घ्या. चविष्ट असे हे दम पनीर खाण्यासाठी तयार आहे, याला कोथिंबीर आणि पुदिन्याने सजवून गरम गरम सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

फेशियल टिकवून ठेवताना...

फेशियल टिकवून ठेवताना...
फेशियलमुळे चेहरा खुलतो, ताजातवाना दिसू लागतो. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन केलेलं महागडं ...

दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

दीर्घ श्वास घेण्याचे फायदे
योग्यरीत्या श्वास घेणे समग्र आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्यरीत्या श्वास ...

बोध कथा : देवाचा मित्र

बोध कथा : देवाचा  मित्र
एक लहान मुलगा फाटक्या जुन्या बुटांसह प्लॅस्टिकच्या चेंडूने खेळत होता.लोकांना त्याचे फाटके ...

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा
साहित्य- कणकेसाठी 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे, ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात
चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे ...