1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (14:50 IST)

चटपटीत कैरीचे लोणचेच

mango pickle
साहित्य : कैर्‍या कडक व आंबट अर्धा किलो, तेल १ वाटी, मोहरीची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी, मेथीची पावडर अर्धा चमचा, बडीशेप १ चमचा, हळद पाव वाटी, हिंग पावडर १ चमचा इ.
 
कृती : कैऱ्या धुऊन-पुसून फोडी करून घ्याव्या. कढईत तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे. नंतर त्यात हिंग, हळद, मेथी पावडर, बडीशेप, मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. सहा महिने लोणचे टिकेल.
 
टीप : लोणच्यात टाकावयाचे मीठ रवाळ भाजून थंड करून घालावे. म्हणजे लोणचे खमंग होते. मोहरीची डाळ जरा गरम करून वाटून घ्यावी म्हणजे मसाला लोणच्याला चिकटून राहतो व लोणचे लवकर मुरते. तिखट लालभडक असावे. हे लालभडक चटपटीत लोणचे तुमची रसना नक्कीच तृप्त करेल.