गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (12:23 IST)

पौष्टिक असे मूग आणि पालकाचे धिरडे रेसिपी

Moong and Spinach Dhirde Recipe
सकाळी जवळजवळ सर्वांनाच आरोग्यदायी नाश्ता हवा असे वाटते. जेणेकरून दिवस देखील उल्हासीत जाईल पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, नाश्त्याला बनवावे तरी काय? म्हणून आज आपण अशीच स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत जी चविलातर स्वादिष्ट लागतेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे ती रेसिपी आहे पालकाचे धिरडे, तर चला जाणून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
अर्धा कप भिजवले मूग 
एक कप कापलेला पालक 
सह ते सात लसूण पाकळ्या 
एक कांदा 
एक शिमला मिरची 
चवीनुसार मीठ 
तेल 
 
कृती-
मूग आणि पालकांचे धिरडे बनवण्यासाठी सर्वात आधी मूग रात्रभर भिजत घालावे मग सकाळी पालक आणि मूग मूग मिक्सरमधून बारिक करावे. आता यामध्ये मीठ घालून बारिक पेस्ट बनवून घ्यावी.  आता सिमला मिरची एक कांदा बारिक चिरून यामध्ये घालावा तसेच एक चमचा चॅट मसाला घालावा व अर्धा तास भिजत ठेवावे आता यानंतर, आता मिश्रण पुन्हा चांगले ढवळून घ्या. तसेच आता तवा गरम करून मिश्रण तव्यावर ओतावे. त्यानंतर तूप लावून शेकून घ्यावे तर चला तयार आहे आपले मूग पालक धिरडे, पुदिना चटणीसोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik