रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

लंच-डिनर मध्ये मिळत नाही ऑप्शन, तर झटपट बनवा पालक लहसुनी

Palak Lahsooni Recipe
अनेक जणांना पालक आवडत नाही. लहान मुलं तर कमीच खातात. तसेच अनेक महिलांना प्रश्न पडतो की, लंच किंवा डिनरमध्ये काय बनवावे. तर आज आम्ही तुम्हला पालकाची एक रेसिपी सांगणार आहोत ज्यांना पालक आवडत नाही, अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण पालकाची ही रेसिपी आवडीने खातील. या रेसीपीचे नाव आहे पालक लहसुनी, तर चला लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
फ्रेश पालक 
तेल 
कापलेला कांदा 
टोमॅटो 
लसूण 
लाल मिरची 
तिखट 
मीठ 
भाजलेले शेंगदाणे 
भाजलेली चणे डाळ 
 
कृती-
सर्वात पहिले पालक स्वछ धुवून घ्या. मग मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये दाणे आणि चणे डाळ बारीक करून घ्यावी. एका पॅन मध्ये तेल गरम करून यामध्ये कापलेला कांदा, लसूण, चिरलेला पालक घालावा. मग परत पॅनमध्ये तेल घेऊन लाल मिरची, जिरे, चिरलेला कांदा, लसूण, टोमॅटो, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे. यामध्ये दाणे आणि चणे डाळ ची पेस्ट घालावी. मग थोडेसे पाणी घालावे व शिजण्यास ठेऊन द्यावे. तेल सुटायला लागले की समजावे पालक शिजला आहे. आता तुम्ही हा लहसुनी पालक गरम पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik