मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (07:50 IST)

संध्याकाळच्या चहा सोबत नक्की ट्राय करा पापड टॅको

Tacos
भारतीय जेवण पापड आणि लोणच्याशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक पापड हा आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का पापड पासून एक चविष्ट डिश सुद्धा बनवता येते. आज आपण पाहणार आहोत पापडापासून बनणारा पापड टॅको पदार्थ. तर चला जाणून घ्या रेसिपी.
 
साहित्य- 
पापड
कांदा
टोमॅटो
काकडी
कॉर्न
राजमा
पनीर 
लसूण
मीठ चवीनुसार 
काळे मीठ 
चाट मसाला
काळी मिरी पूड 
सॉस
लेस किंवा चिप्स
 
साहित्य-
पापड टॅको बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये पापड गरम करून घ्यावे म्हणजे ते पॅनमध्ये ठेऊन भाजून घ्यावे. यानंतर गरम पापड एका ग्लास मध्ये ठेवावे. आता आपण मेयोनीज तयार करून घेऊ या. याकरिता आपण ग्राइंडर मध्ये पनीर, लसूण आणि मीठ घालून बारीक करून घ्यावे. आता मसाला तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटो, काकडी बारीक कापून घ्यावे. आता एका बाऊलमध्ये कापलेल्या भाज्या, कॉर्न, सॉस, काळे मीठ, मिरे पूड आणि चाट मसाला टाकावा. तसेच हे चांगल्याप्रकारे मिक्स करावे. यानंतर हे मसाले पापडमध्ये भरावे. आता टॅकोला मेयोनीज मध्ये गार्निश करावे. तर चला आपले पापड टॅको बनून तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik