रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

संध्याकाळी चहा सोबत टेस्टी लागतात किनोआ(Quinoa)कटलेट, लिहून घ्या रेसिपी

Quinoa cutlet recipe
संध्याकाळी छोटी छोटी भूक लागल्यावर अनेक लोक नेहमी चहा पिटतात. तसेच सोबत काहीतरी स्नॅक्स खातात. पण हे स्नॅक्स तुमच्या शरीराला घटक असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेल्दी आणि चविष्ट किनोआ कटलेट. तर लिहून घ्या पटकन किनोआ कटलेट रेसिपी 
 
साहित्य 
अर्धा काप किनोआ 
एक कप पाणी 
150 ग्रॅम पनीर 
एक कप पालक 
दोन चमचे लिंबाचा रस 
बारीक हिरवी मिरची 
दोन चमचे बेसन 
एक चमचा काश्मिरी मिरची 
धणे पावडर 
मीठ चवीनुसार 
 
कृती 
किनोआ चांगल्या प्रकारे धुवून घ्यावा. कुकरमध्ये पाणी टाकून एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये बारीक कापलेला पालक घ्यावा. सोबतच पनीरचे तुकडे मिक्स करावे. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. तसेच हिरवीमिरची, आले पेस्ट घालावी. काश्मिरी लाल मिरची, धने पावडर देखील घालावी. 
 
कुकरमधून किनोआ कडून या मिश्रणामध्ये घालावा. चांगल्या प्रकारे मिक्स करून गोळा तयार करावा. मग हाताला तेल लावून कटलेटचा शेप द्यावा. तसेच का पॅनमध्ये तूप टाकून त्यावर हे कटलेट माध्यम गॅस वर शिजवावे. तयार कटलेट हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Published By- Dhanashri Naik