शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (15:21 IST)

पटकन नाश्ता तयार करायचा ? मग रवा चीला बनवा

Rawa Cheela
सामुग्री- 
1 कप सूजी या रवा
1 कप पाणी
1 बारीक चिरलेला कांदा
अर्धा कप दही
अर्धा लहान चमचा आले-लसूण पेस्ट 
मीठ चवीप्रमाणे
2 बारीक चिरलेले टॉमेटो
1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
2 चमचे बारीक चिललेली कोथिंबीर
तेल
 
कृती-
सर्वातआधी एका बाऊलमध्ये रवा घ्या. त्यात दही मिसळा.
आता यात मीठ आणि एक कप पाणी घाला. फेटून घ्या.
रवा 15 ते 20 मिनिट तसाच राहू द्या.
आता यात टॉमेटो, कांदा, मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाका.
सर्व मिसळून घ्या आणि एक थिक फ्लोइंग कंसिस्टेंसी असणारा मिश्रण तयार करा. अर्थात गरज भासत असेल तर पाणी घाला.
आता तव्यावर तेल लावून त्यावर बॅटर पसरवून द्या.
आता कोपर्‍याने तेल सोडा आणि पालटून दोन्हीकडून शिजवून घ्या.
क्रिस्पी होईपर्यंत तव्यावर राहू द्या.
आता गरमागरम चीला सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.