गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

अंबाडीच्या भाजीतील धपाटे

साहित्य : 1 जुडी अंबाडीचा पाला तोडून, स्वच्छ धुऊन चिरून पाण्यामध्ये उकडून घ्यावा. वरवरचे पाणी काढून टाकावे. 2 वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी बेसन, 2 चमचे कणीक, तिखट, मीठ, हळद, लसणाचे व जिरे मिसळून केलेले वाटण, 2 चमचे तीळ.

कृती : सर्व पीठ एकत्र करून तिखट, मीठ, हळद, जिरे लसणाची पेस्ट व तीळ घालावेत, अंबाडीचा शिजवलेला पाला घोटून पाण्यासकट घालावा व पीठ भिजवून घ्यावे. घट्ट वाटल्यास तोडे पाणी घालून घट्ट गोळा तयार करावा. धपाटे लाटून गरम तव्यावर तेल लावून शेकावेत. आंबट व चवीचे धपाटे, दाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावेत.