बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (19:50 IST)

महाराष्ट्रातील लष्करपदी पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी

लेफ्टनंट जनरल डॉ .माधुरी कानिटकर..
 
आजच्या काळात जेव्हा स्त्री आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने कार्यरत आहे. त्यावेळी भारताच्या लष्करात देखील महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे. त्यासाठी महिलांना लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळविण्यासाठी लढावे देखील लागले. पण ती लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असून महाराष्ट्रातील मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टिनेंट जनरल पदावर नियुक्ती मिळाली असून त्यांना या पदासाठी बढती देण्यात आली आहे. 
 
या उच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहे. त्यांनी एकात्मिक संरक्षण विभाग नवी दिल्ली येथे त्या विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस -वैद्यकीय) या पदावर आहे. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत येत असून लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर तिसऱ्या महिला अधिकारी असून बालरोगतज्ञ देखील आहे. यांचे पती राजीव कानिटकर हे देखील लष्करात लेफ्टनंट कर्नल या पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहे. या कानिटकर दांपत्याने लष्करात लेफ्टनंट कर्नल पद भूषविले आहे. 
 
डॉ. माधुरी कानिटकर सध्या सीडीएस वैद्यकीय पदावर नियुक्त असून भारतीय लष्करातील तिन्ही दल -हवाई दल, नौदल, आणि स्थळ दल तिन्ही सेवाच्या संदर्भात केंद्र सरकारला सल्ला देण्यासारखे महत्त्वपूर्ण काम करतील. कानिटकर यांनी पीडियाट्रिक आणि पीडियाट्रिक नेफ्रॉलॉजी चे शिक्षण एम्स मधून घेतले आहे. पुण्यातील एएफएमसी येथे त्या 2 वर्ष अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. विगत वर्षी त्याने मेजर जनरल मेडिकल उधमपूरात कारभार हाताळले. त्यांची गेल्या वर्षीच लेफ्टिनेंट या पदासाठी निवड झाली असून या वर्षी त्यांनी कार्यभार सांभाळले आहे. 
 
त्रितारांकित अधिकारी पद नौदलात व्हाइस ऍडमिरल स्थल सेनेत लेफ्टिनंट जनरल आणि हवा‌ई दलात एयर मार्शल असे अधिकारी पद असतात. लेफ्टिनंट जनरल पदी सर्वात पहिले पुनिता अरोरा नियुक्त झाल्या होत्या. तत्पश्चात ह्याच पदी पद्मावती बंदोपाध्याय यांची निवड झाली होती. आता या वर्षी डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल झाल्या असून यांना या पदी भूषविले आहे.
 
त्यांचा म्हणण्यानुसार अशक्य ते शक्य साध्य करण्याचे आव्हान तर प्रत्येक स्त्रीने स्वतःला दिले पाहिजे. कधीही हार मानू नका. स्वतःला कमकुवत मानू आणि म्हणू नका. भारतीय लष्कराचे काम पारदर्शक, न्यायी असून आपल्या कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळत असते. आपल्या संधीचे सोने करून प्रत्येक दिवस उत्साहात आणि आनंदाने साजरा करायला हवा. या जगात तर निम्मे जग महिलांसाठीच आहे. पण देशाच्या सेवेसाठी काहीही बंधन नसल्याने आपले ते योग्य आणि उत्तम या देशासाठी द्यावे.