testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'स्त्री' अशी घडते

women's day
वेबदुनिया|
'पेरावे तसे उगवते' ही म्हण कृषीक्षेत्रात जितकी खरी तितकीच ती शिक्षणक्षेत्रातही खरी आहे. पेरण्याची क्रिया ज्यांच्याकडून होते त्यापैकी काही सजीव व्यक्ती असतात. शिक्षक, पालक, मित्र, नातेवाईक अशा या सजवी व्यक्ती मुलांच्या मनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काही पेरीत असतात. चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, वस्तूसंग्रहालये अशा माध्यमातून मुलांच्या मनात काहीबाही पेरल जाते. यापैकी व्यक्ती महत्त्वाच्या की यंत्रणा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा माझा इरादा नाही. मात्र एवढे निश्चित की, सजीव व्यक्तीकडून होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचा मुलांना घडविण्यात फार मोठा वाटा असतो. हा वाटा मान्य केल्यामुळेच पालकांचा व शिक्षकांचा कालविसंगत दृष्टिकोन अधिक हानीकारक ठरतो.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री मुक्ती चळवळीच्या झोतात वावरणार्‍या आजच्या शिक्षकांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कोणता आहे, यावर आज प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मुलींचे म्हणजेत उद्याच्या स्त्रियांचे विकसन बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. आजच्या माध्यमिक शिक्षकांनी कुटुंब जीवनातील स्त्रीचे स्थान, तिच्या जबाबदार्‍या तद्विषयक पात्रता अशा अनेक बाबीसंबंधी काय वाटते हे समूजन गेऊन दृष्टिकोनाता कालसुसंगतता आणणे खरे तर महत्त्वाचे आहे.

मुली विनयशील, लाजाळू, निटनेटक्या व अभ्यासू असतात. असे मानून आपण त्यांच्यावर अनेक गोष्टी लादतो की काय हा विचार मनात येतो. मुली ‍अधिक विनयशील असतात, असे म्हणणार्‍या लोकांच्या मनात 'मुलींनी विनयशील असलेच पाहिजे' असा विचार असण्याचा संभव आहे. मुलीच्या जातीने निटनेटके असलेच पाहिजे (कारण असलेले सौंदर्य खुलवून मांडणे हेच त्यांचे प्रमुख भांडवल) अशा विचारांमुळे पुरुषवर्गाकडून मुलींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचना होत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, मुली अभ्यासू असल्या तरी फारशा नसतात अशीही एक समजूत शिक्षकात रूढ दिसते.

या समजुतीला संशोधनाचेपाठबळ मात्र मिळत नाही. आजच्या माध्यमिक शाळांतिल मुलींना शिक्षण देणार्‍या शिक्षकांची ही अभिमते भावी काळाच्या दृष्टीने सुयोग्य आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, 'जसा राजा तशी प्रजा' असे म्हणतात. शिक्षकांमार्फत होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचे महत्त्व जाणणार्‍या विचारवंतांनी व सामाजिक कर्यकर्त्यांनी मुलींच्या शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षकांच्या विविध विचारधारणांना अधिक शास्त्रशुद्ध पाया मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा.

- अरुणा सबाने


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

आसनाचा राजा म्हणजे शीर्षासन

national news
शीर्षासन या आसनाला योगासनामध्ये आसनाचा राजा म्हणून संबोधले जाते. या आसनात संपूर्णशरीराचा ...

ही औषधे घेता का?

national news
ऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना ...

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

national news
लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...