testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मी आणि मी

वेबदुनिया|
माझ्यातील आतल्या 'मी' ला माझ्यातील बाहेरच्या 'मी' नं
सहज साद घातली
चार घटका
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू
म्हणून चटकन बैठक मारली.

बाहेरचा 'मी' चांगलाच गोष्टीवेल्हाळ
शब्दामागून शब्द संपेचनात्
घटनांचं गुर्‍हाळ आवरेचना
आतला 'मी' मात्र गप्पगप्पच
एखादाच उद्गार,
क्वचित ओठांची मुरड
फारच झालं तर भिवईचं उंचावणं
अती झालं तेव्हा एकच सांगणं निर्वाणीचं

'कशाला भुलवतोस स्वत:ला
आणि दुसर्‍यालाही।
थोडं आत बघ
तुझी हुबेहुब छबी
कोरली गेली आहे येथे
त्यावर उसनं नक्षीकाम
रंगरंगोटी कशाला करतोस?
एकाच पावसात सगळं पार धुऊन निघेल.
आपल रूप माझ्यात पाहयला लागशील
तेव्हा सगळं भरून पावशील'

डॉ. सौ. उषा गडकरी


यावर अधिक वाचा :

माझा शहरासाठी उपयोग करून घ्या – आयुक्त तुकाराम मुंढे

national news
इथे आहे तोवर माझा उपयोग करून घ्या आपण शहर योग्य पद्धतीने सुधारित करू. पुणे येतील नागरिक ...

आता दर शुक्रवारी दुधाचे भाव ठरणार

national news
आता सहकारी दूध संघांनी दुधाचा दर कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ...

अल्जिरिया : आल्या परीक्षा, देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

national news
अल्जिरियात शाळाशाळांमधून डिप्लोमाच्या परीक्षा सुरू झाल्यात. त्यामुळे या काळात कॉपी ...

निलम गोऱ्हे यांच्या घरी निघाला विषारी साप

national news
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील घरात सकाळी 5 च्या ...

​'ड्राय डे'च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' ...

national news
आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, ...