testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रश्न हे अनुत्तरीत

(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)

वेबदुनिया|
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून साजरा करण्याचे ठरले. वरकर्णी पहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे.....
महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत?

ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही?

अजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. राजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्‍या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तया करणार आहोत की नाही?

दिल्लीच्या निर्भयापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चिमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडियातधून येत असताना या महिलादिनाची उपयुक्तता आरि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे राहत?

देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का?

सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीत बिकट आहे. बहुसंक्य वेळा मानसिक त्रासाला कंटाळून स्त्रियांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत?


यावर अधिक वाचा :

बराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी

national news
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...

चार दिवस सलग बँका बंद राहणार

national news
बँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...

आसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार

national news
बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...

मृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव

national news
घरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...

भारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान

national news
नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...