रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (16:37 IST)

Mother's Day Quotes In Marathi मदर्स डे शुभेच्छा

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
 
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
 
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
 
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते
डोळे वटारुन प्रेम करते ती बायको असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते
खरंच आई किती वेगळी असते...
 
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे 
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.
 
दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, 
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, 
आठवते ती फक्त आई.
 
आई म्हणजे मंदिराचा कळस, 
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी 
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी.
 
आत्मा आणि ईश्वर 
यांचा संगम म्हणजे आई.
 
ठेच लागता माझ्या पायी 
वेदना होती तिच्या हृदयी 
तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.
 
स्वतःआधी तुमचा विचार करते ते म्हणजे आई.
 
जगातील एकच न्यायालय आहे, 
जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.
 
देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, 
तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही.
 
प्रेम तुझे आहे आई या जगाहुनी भारी 
म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
 
लंगड्याचा पाय, दुधावरची साय, 
सर्व जगाहुन न्यारी आहे माझी लाडकी माय.