गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (12:33 IST)

मुंबई विमानतळावर आई आणि मुलीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर तब्बल 4.95 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जोहान्सबर्ग येथून आलेल्या दोन महिलांकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन महिला आई-मुलगी आहेत. 
 
असे सांगितले जात आहे की आई आणि मुलीची ही जोडी विदेशी पर्यटक म्हणून मुंबईत आली होती. अटकेनंतर, महिलेने सांगितले आहे की ती आणि तिची मुलगी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून भारतात कतारच्या दोहा मार्गे मुंबईत भारतात आल्या आहेत.
 
5 किलो हेरॉईन सुटकेसमध्ये लपवून ठेवली होती
 
 
 
आई आणि मुलीने त्यांच्या सूटकेसच्या आत एक विशेष पोकळी बनवून सुमारे 5 किलो हेरॉईन लपवून ठेवली होती. काळ्या रंगाच्या पॅकेटमध्ये काळजीपूर्वक लपवलेली होती. यानंतर, मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायद्यांतर्गत 4.953 किलो हेरॉईन तस्करीचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक केली. कस्टम स्रोतांनुसार, आई-मुलीच्या जोडीला ड्रग्ज माफिया रॅकेटने ड्रग्ज तस्करीचे आमिष दाखवले, जिथे त्यांना सहलीसाठी ५,००० अमेरिकन डॉलरचे आश्वासन देण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 
 
फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली या दोघीही भारतात आल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या मते, सहसा प्रवासी एकावेळी दोन किलोपेक्षा जास्त औषधे घेऊन प्रवास करत नाहीत.
 
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन भारतात आणण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना प्रत्येकी 5 हजार डॉलर देण्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतातील आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास आता करण्यात येत आहे.