बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (16:00 IST)

समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग

मुंबई चर्चेत आलेले एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्मांतराचे आरोप करण्यात आले. मात्र, समीर वानखेडे यांनी धर्मांतर (Conversion) केले नसल्याचे मत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर (Arun Haldar) यांनी सांगितले की, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेयांची जातीसंबंधीची कागदपत्रे मी तपासली आहेत. त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नासल्याचे सांगितले.
 
मुंबई दौऱ्यावर आले असताना वानखेडे यांनी अरुण हलदर यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तक्रार दिली. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना ते म्हणाले की, काही लोक कुटुंबावर जातीवरुन आरोप करीत असल्याने वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही मागासवर्गीय आहात का? असे विचारले असताना त्यांनी हो म्हणून सांगितले, तसेच काही पुरावेही सादर केली आहेत. ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे, त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
 
त्यांच्याशी बोलताना महार जातीचे असल्याचे मला जाणवले. त्यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार झाला होता.त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. मात्र, आपण एकतर्फी निर्णय देणार नाही,असे सांगून ते म्हणाले, आमच्याकडे यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करु.या प्रकरणात महाराष्ट्र सरकार  काय करते ते पाहू.त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.