सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:17 IST)

भाजपा विरोधात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार- संजय राऊत

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, या बद्दल त्यांनी  सूतोवाच केलं. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. ”शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात सांगितलं.
 
“ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले. “पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, याबद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु” असे संजय राऊत म्हणाले. एकत्र निवडणुकच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.