शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (09:17 IST)

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त

मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला असून CNG आणि PNG च्या दरात कपात करण्यात आली आहे.नव्या दरपत्रकानुसार, CNGच्या दरात सहा रुपये प्रति किलो तर PNGच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती.
 
त्यानंतर आता या दरात पुन्हा कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने (MGL) घेतला आहे. आजपासून इंधनाचे नवे दर लागू होतील, असं कंपनीने सांगितलं आहे.