गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (12:42 IST)

डेंटिस्ट असताना गर्भपात केंद्र चालवणारी आरोपी डॉक्टर पसार

मुंबईतील वसई- विरार परिसरातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या परिसरात डेंटिस्ट असलेली महिला डॉक्टर चक्क गर्भपात केंद्र चालवायची. डॉ. आरती वाडकर या डेंटिस्ट असून आपल्या पती सुनील वाडकर यांच्या रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवायच्या. विशेष म्हणजे की या महिला डेंटिस्ट डॉक्टरच्या पती ला काही दिवसांपूर्वी बोगस वैद्यकीय पदवी असण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 
 
काही दिवसापूर्वी आरती वाडकर यांच्या पती सुनीलला  पोलिसांनी बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती. सुनील हे वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय पदावर कार्यरत असून सध्या विरार महामार्गावर हायवे आणि नालासोपारा येथे नोबल अशी दोन खासगी रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवीत होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या एका पथकाने तपासणी केल्यावर सुनील यांच्याकडे एमबीबीएस ची पदवी बनावट असल्याचे आढळले. त्यासाठी त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता त्याच्या पत्नी आरती वाडकर या डेंटिस्ट असून अनधिकृतपणे गर्भपात केंद्र चालविण्याचे उघडकीस आले आहे. हे दोघे पती पत्नी पसार झाले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन आरोपी पती आणि पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून हे दोघे पती-पत्नी पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.