गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (09:23 IST)

मुंबईत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू

मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. जे.जे.मध्ये आतापर्यंत ४०४ जणांना, तर सायन रुग्णालयात १५१ जणांना डोस देण्यात आला आहे. 
 
मुंबईत सायन आणि जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन या मानवी लसीचा प्रयोग सुरू आहे. देशभरातील २५ वैद्यकीय संस्थांमध्ये सुमारे २६ स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल. दाेन्ही रुग्णालयांत मिळून जवळपास ५५५ स्वयंसेवकांनी सहभागासाठी नोंद केली आहे. सायन आणि जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीच्या पहिल्या डोसनंतर अत्यल्प प्रमाणात दुष्परिणाम दिसून आला.
 
लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या २ ते ३ स्वयंसेवकांना थोडासा ताप आल्याचे निदर्शनास आले. दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी हजार स्वयंसवेकांची गरज आहे. स्वयंसेवकांच्या सहभागासाठी स्थानिक नगरसेवकांचीही मदत घेतली जात आहे. दर दिवशी १५ ते २० स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात येत आहे. जे.जे.मध्ये मंगळवारी १६ स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. तर नऊ स्वयंसेवक दुसऱ्यांदा लसीचा डोस घेण्यासाठी आले होते.