गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (09:09 IST)

पत्री पुलाचा पुलाचा सर्वात कठीण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबईतील कल्याण येथील पत्री पुलाच्या  उर्वरित 10 टक्के गर्डर लॉचिंगचे काम रात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक येऊन सुरु झाले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. 
 
पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा 76 मीटर गर्डर लाँचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी 21 नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित 40 मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 22 तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामुळे 90 टक्केच काम होऊ पूर्ण शकले. उर्वरित 10 टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती.  रेल्वे प्रशासनाने रात्री 1.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला.
 
मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरु झालेले गर्डर लाँचिंगचे काम पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण झाले. श्रीकांत शिंदे हे सकाळप्रमाणेच मध्यरात्रीही काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी हजर होते.