गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 15 जून 2020 (13:06 IST)

माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक 'सामना'च्या संपादक सौ. रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक श्री. माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सौ. रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.