बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:45 IST)

मास्क न लावताही गाडी चालविता येणार

महानगरपालिकेने वाहनधारकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार आता खासगी वाहनधारकांना मास्क न लावताही गाडी चालवता येणार आहे. खासगी वाहनांमध्ये मास्क न घालणार्यांोवर पालिकेकडून आता कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
 
मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या नियमांमध्ये हळूहळू सूट देण्यात येत आहे. खासगी वाहनांमध्ये मास्क न घातल्यास आता दंड आकारला जाणार नसला तरी सार्वजनिक वाहनांमध्ये मात्र मास्क घालणे गरजेचे आहे, असे पालिकेने नव्या नियमावलीत नमूद केले आहे. कोरोनापासून बचावासाठी मुंबई महानगरपालिकेने 8 एप्रिल 2020 रोजी सर्व नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले होते.