सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2024 (18:35 IST)

गुजरात मध्ये भीषण बस अपघातात 3 जण ठार, 45 जखमी

गुजरात मध्ये अरावली येथे मोडासा गोधरा महामार्गावर एका खासगी बस आणि सरकारी बसची धडक होऊन अपघात झाला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 45 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बस जगन्नाथ पुरी येथून परतताना अपघात झाला. सर्व लोक सणवली येथील रहिवासी होते. 
 
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बसच्या चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने अपघात झाला. त्याने एका दुचाकीला धडक दिली नंतर बस दुभाजकाला ओलांडून दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या बसला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वारांसह एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा संपूर्ण अपघातात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मध्ये बस कशी दुसऱ्या बसला येऊन आदळली हे दिसत आहे. अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोलिसांनी बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit