1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (11:11 IST)

पुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

4 terrorist killed in Pulwama
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. चौघेही लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. चौघांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 
सोमवारी पहाटेपासून परिसरात शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात सुरक्षा दलातील तीन जवानही जखमी झाले आहेत.