बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (10:26 IST)

१० पैकी ५ भारतीयांना लाच द्यावी लागते

गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांच्या कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दर १० पैकी ८ लोकांनी पोलीस, पालिकेचे अधिकारी यांना लाच दिल्याची कबुली दिली आहे. याशिवाय मालमत्ता नोंदणी आणि व्हॅटसाठी चिरमिरी देणाऱ्यांचे प्रमाणदेखील ८० टक्के इतके आहे.

लोकल सर्कल या संकेतस्थळाने देशातील भ्रष्टाचाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केले. यासाठी देशातील २०० पेक्षा अधिक शहरांमधून ऑनलाईन माहिती गोळा केल्याचा दावा संकेतस्थळाने केला. यामध्ये सुमारे १ लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याची माहितीदेखील संकेतस्थळाने दिली. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना भ्रष्टाचाराबद्दल ८ प्रश्न विचारण्यात आले होते.