गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (11:00 IST)

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई सातवे

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभागी 4237 शहरांमधून नवी मुंबई शहराला देशातील सातव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यालाही देशात तिसर्‍या क्रमांकाच्या स्वच्छ राज्याचे मानांकन प्राप्त झाले. विशेष म्हणजे अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये नवी मुंबई पालिकेस नागरिक प्रतिसाद क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर पुरस्कार दिल्लीमध्ये विज्ञान भवन  येथे प्रदान करण्यात आला.
 
यावर्षी केंद्रीय निरीक्षक पथकाने स्टार रेटिंगच्या निकषानुसार कागदपत्रे व प्रत्यक्ष तपासणी केली असून नवी मुंबई पालिका थ्री स्टार रेटिंगची मानकरी ठरली आहे. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहरामध्येही नवी मुंबई पालिकेस ओडीएफ डबल प्लस रेंटिंग प्राप्त झाले आहे.