1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:44 IST)

आता आधारकार्डसाठी हेल्पलाईन नंबर

आधारकार्डबाबत सर्व काही माहिती घरबसल्या मिळण्यासाठी १९४७ हा  हेल्पलाईन नंबर  सुरु केला आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत कोणतीही मिळू शकणार आहे. हा नंबर चौवीस तास उपलब्ध असणार आहे. या  कॉलसेंटरमध्ये  प्रतिनिधी सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. तर रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजपर्यंत उपलब्ध असणार आहे.सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही सेवा मिळणार आहे. आधार कार्ड काढायचे असेल किंवा तुम्ही आधार कार्ड काढले असेल तर त्याची माहिती जाणून घेऊ शकता. तसेच पत्ता बदलण्याबाबत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या टोल फ्री नंबरवरुन मिळू शकणार आहे.