1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (11:10 IST)

आधारकार्डला लॅमिनेशन, प्लास्टिक कोटिंग केले तर बिनकामाचे ठरणार

Aadhaar card
आधारकार्डला लॅमिनेशन केले असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असेल, तर ते कार्ड बिनकामाचे ठरणार आहे, असे आता ‘यूआयडीआयए’ने स्पष्ट केले आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डचा क्यू आर कोड काम करणे बंद होऊ शकते किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय यूआयडीआयएने घेतला आहे.
 

प्लास्टिक किंवा लॅमिनेशन केलेल्या आधारकार्डचा काहीही उपयोग नाही. कागदावर छापण्यात आलेलेच आधारकार्ड योग्य आहे, असे ‘यूआयडीआयए’चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी म्हटले आहे. आधारकार्ड जेव्हा लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगसाठी दिले जाते, तेव्हा आधारकार्डवर असलेल्या क्यू आर कोडचा गैरवापर केला जातो. क्यू आर कोडद्वारे खासगी माहिती सार्वजनिक होते. आधारकार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले, तर तो एक गुन्हा आहे आणि कायद्यात त्यासाठी शिक्षा किंवा दंड भरण्याचीही तरतूद आहे, असेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट किंवा प्लास्टिक आधार कार्ड अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. तसंच अनधिकृत व्यक्तीला आधार कार्ड नंबर देऊ नका, असं आवाहन युआयडीएआयने केलं आहे. अनधिकृत पद्धतीनं आधार कार्डची माहिती घेणं किंवा ते छापणं दंडनीय अपराध आहे. असं केलं तर कायदेशीर कारवाई होईल आणि दोषींना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा युआयडीएआयने दिला आहे.