बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्वर्गीय अरुण जेटली यांची कारकीर्द कशी होती, वाचा

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं दिर्ग आजाराने  आज निधन  झालं. त्यांनी  वयाच्या 66 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरच श्वास घेतला. फुप्फुसातील संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
 
कोण होते अरुण जेटली एक प्रसिद्ध वकील ते राजकारणी
 
अरुण जेटली यांचा जन्म  28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांचे पूर्ण शिक्षण राजधानी  दिल्लीतच झाले होते.  त्यांनी विद्यार्थीदशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवा नेता म्हणून काम करायला सुरुवात केली व आपल्या कामाची छाप सिडली होती. त्यांचे वडील पेशाने वकील असल्याने जेटली यांनी देखील 1974 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापिठातून कायदा शाखेतील पदवी मिळवली. दिल्ली विद्यापीठात अभाविपकडून 1974 मध्ये विद्यार्थी नेता म्हणून निवड झाली होती.  
 
जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली तेव्हा  त्यांनी 19 महिने तुरुंगवास भोगला. 1973 मध्ये राज नारायण आणि जेपी नारायण यांनी भ्रष्टाचाराविरोधात उघडलेल्या मोहिमेत जेटली एक प्रमुख युवा नेते होते. आणीबाणीनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर अरुण जेटलींनी जन संघात प्रवेश केला.
 
 
 
·         सुप्रीम कोर्ट आणि देशातील विविध हायकोर्टांमध्ये त्यांनी वकिली
 
·         1990 मध्ये त्यांना दिल्ली हायकोर्टाने वरिष्ठ वकील म्हणून मान्यता
 
·         व्ही. पी. सिंह सरकारकडून 1989 मध्ये जेटलींची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून निवड
 
·         बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी
 
·         जनता दलचे नेते शरद यादव, काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी जेटलींनी वकिल
 
·         पेप्सिको विरुद्ध कोकाकोला हे प्रकरणही जेटलींनी हाताळलं.
 
·         कायदेमंत्री असताना जेटलींनी पेप्सीकोसाठी खटला लढवला
 
·         जेटलींनी 2009 मध्ये वकिली थांबवली
 
·         राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी काम
 
·         अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी
 
·         2014 पर्यंत ते जनतेमधून कोणतीही निवडणूक लढले नाहीत
 
·         2014 मध्ये त्यांनी अमृतसरमधून निवडणूक लढले काँग्रेसचे तेव्हाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभव