गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मे 2018 (09:14 IST)

विमानप्रवासात सामान हरविल्यास नुकसान भरपाई

देशांतर्गत विमानप्रवास करताना एखाद्याचे सामान हरविल्यास तीन हजार रुपये व सामानाचे नुकसान झाले असल्यास एक हजार रुपये इतकी भरपाई त्या प्रवाशाला देण्याचे विचाराधीन आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने ज्या नव्या नियमांचा आराखडा तयार केला आहे. त्यात याचाही उल्लेख आहे.सामान हरविल्याची किंवा सामानाचे नुकसान झाल्याची तक्रार केली तरी विमान कंपन्या त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रवाशाला येणारी उद्विग्नता कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्रवासी मरण पावला तर त्याच्या वारसदारांना किंवा जखमी झाला असल्यास त्याला भरपाई देताना तो आंतरराष्ट्रीय मार्गाने की देशांतर्गत प्रवास करत होता असा भेद करू नये, असे यात म्हटले आहे.
 
सर्व विमानतळांवर डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा त्याचबरोबर प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. टर्मिनसच्या ठिकाणी पुरेशी शौचालये असावीत, प्रवाशांसाठी मदतकक्ष असावा, विमानतळावरील प्रवाशांना किमान अर्धा तास मोफत वाय-फाय सेवा द्यावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.