रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (15:28 IST)

अमरनाथ यात्रेसाठी कोविड व आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल

यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी कोविड चाचणी बंधनकारक असून त्यासाठी त्यांना आर टी पी सी आर चाचणी करावी लागेल.
 
कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठी सर्वोच्च न्यायालयानं गठीत केलेल्या उपसमितीची बैठक राज्याचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू-काश्मीरमध्ये झाली, त्यावेळी ते बोलत होते. अमरनाथ यात्रेच्या तयारीचा सुब्रमण्यम यांनी आढावा घेतला.
 
कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अमरनाथ यात्रेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार अमरनाथ यात्रेसाठी राज्यात येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूची कोविड चाचणी करण्यात येणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल, तसंच जम्मू इथून रस्ते मार्गानं दर दिवशी केवळ ५०० यात्रेकरूंना यात्रेसाठी पुढे सोडलं जाईल, असं ते म्हणाले.
 
यात्रेदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं सुब्रमण्यम यांनी सांगितलं.