1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

Asaram Bapu convicted of rape
जोधपूर-  जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे तर दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण बघत राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करुन सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहे.
 
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम 5 वर्षाहून अधिक काळापासून करागृहत कैद आहे. 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपुर पोलिसांनी आसारामला मध्यप्रदेशातील इंदूर येथील खंडवा रोड स्थित आश्रमाहून अटक केली होती.
 
दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाने समाधानी आहोत. आमच्या लढल्याला यश आलं असून आमच्या बाजूने निर्णय आला आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.