testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चालत्या ट्रेनचे झोपेत महिलेने उघडल दार तिचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये एका महिलेला गाढ
झोपेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात चालत्या ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडण्याऐवजी, मुख्य दरवाजा उघडल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घरातील सवयी कश्या आपल्या अंगाशी येतात हे समोर आले आहेत.

राजकुमारी शर्मा आणि त्यांचे पती राजेंद्र शर्मा
जोधपूर-भोपाल एक्स्प्रेसने प्रवास करत होते.
मुलाच्या नव्या फ्लॅटची वास्तूशांत अटोपून हे दाम्पत्य परतीचा प्रवास करत होते. दिवसभरच्या धावपळीमुळे दोघेही थकून गेले होते, त्यामुळे ट्रेनमध्ये लवकर झोपी गेले होते. यामध्ये
राजकुमारी

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टॉयलेटकडे जाण्यासाठी उठल्या होत्या . मात्र त्यांना प्रचंड झोप येत होती, त्या तश्याच चालत किलकिले डोळे करत टॉयलेटजवळ असल्याचे समजून त्यांनी ट्रेनचा मुख्य दरवाजा उघडला, आणि एक पाय पुढे टाकला. पण काही कळायच्या आत त्यांचा तोल गेल्याने त्या धावत्या ट्रेनमधून खाली पडल्या.

ही बाब राजकुमारी यांचे पती राजेंद्र यांच्या लक्षात येताच, त्यांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. यानंतर ट्रेनच्या लोकोपायलटला सर्व माहिती सांगितली. लोकोपायलटने डीआरएमशी संपर्क साधल्यानंतर ती ट्रेन जवळपास एक किलोमीटर ट्रेन मागे नेली होती. मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आपण घरी असताना अनेकदा झोपेत असे वागतो, मात्र अशी सवय जीव घेवू शकते हे नक्की.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine