testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खूश आहे कोण?

Last Updated: बुधवार, 31 जानेवारी 2018 (12:49 IST)
अच्छे दिनचे गाजर दाखवून दिल्लीचे तख्त काबीज केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आम जनतेच्या जिव्हाळच्या प्रश्नांकडे ढुंकूनही बघण्यास तयार नाहीत. परदेशवारी, उद्योगपतींसाठी सवलतींची खिरापत आणि धर्माच्या नावावर निवडणुका जिंकण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी चालविला आहे. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळत असून घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढतच आहे. महागाईचा चढता आलेख कमी होईल कधी, याकडे सामान्य जनतेचे डोळे लागले असताना मोदी सरकारला या प्रश्नामध्ये लक्ष देण्यास स्वारस्य वाटत नसावे. नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय फसल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत असल्यामुळेच चालू आर्थिक वर्षात महागाईचे चटके वाढणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले असावेत. 2018 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करताना 2018-19 या आर्थिक वर्षातील विकास दर सात ते साडेसात टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. संपणार्‍या आर्थिक वर्षात सरकारने अपेक्षित धरलेला विकासदर गाठणे आता शक्य नाही. 6.5 टक्क्यांपर्यंत विकासदर राहाण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्योग, कृषी, सकल देशांतर्गत उत्पादन आणि रोजगारात दाखवण्यात आलेले उद्दिष्ट गाठणे अशक्य झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. हवामानातील बदलामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन पंचवीस टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती खरी ठरली तर महागाई आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 च्या निवडणुकीला सामोरे जाणार मोदी सरकारला महागाईचा मुद्दा डोकेदुखीचा ठरू शकतो. रोजगार निर्मिती करण्यात आलेले अपयश, शेतीमालाला योग्य भाव नसल्याने नाराज असलेले शेतकरी, बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे हवालदिल झालेले व्यावसायिक आणि कामगार कामातील बदलामुळे कागारांमध्ये असलेला असंतोष, या सर्व घटकांमध्ये असलेला उद्रेक जर उफाळून आला तर मोदींच्या सत्तेला धक्काही बसू शकतो. देशातील ठरावीक घटक वगळता आम जनता अच्छे दिनपासून लांबच आहे. काँग्रेसच्याच योजनांना नवीन मुलामा देऊन मोदी सरकारने त्या नव स्वरूपात लोकांसमोर मांडल. परंतु जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या अनेक मूलभूत गोष्टींकडे सरकारचे दुर्लक्षच होत राहिले. अटलबिहारी सरकार केंद्रात सत्तेत असताना शायनिंग इंडियाच्या नावाने लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणुकीच्या तोंडावर रथयात्रा काढली होती. परंतु वास्तव गोष्टींकडे दुर्लक्ष करून डोळ्यावरवर सत्तेचे झापड लावलेल्या भाजपला मतदारांनी खाली खेचले. तीच गत सध्या मोदी लाटेच्या हवेत असलेल्या भाजप सरकारची करण्यास मतदारांना फार वेळ लागणार नाही. सर्व घटकांना अपेक्षित असणारा सर्वसमावेशक व महागाईची झळ कमी करणारा अर्थसंकल्प सादर झाला तर ठीक अन्यथा सरकारविरुध्द खदखद कायम राहील.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...