गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (11:57 IST)

भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्रायश्चित, 200 कार्यकर्त्यांचं मुंडण

पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात 'घरवापसी' सुरू आहे. 'भाजपमध्ये जाणं ही आपली चूक होती,' असं म्हणत अनेक कार्यकर्ते प्रायश्चित करतानाही दिसत आहेत.
 
पश्चिम बंगालमधील हुगळी येथे नुकतेच 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण परतताना प्रायश्चित म्हणून त्यांनी जाहीररित्या डोक्याचं मुंडण करून घेतलं आहे.
 
इतकंच नव्हे तर या कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंडण केल्यानंतर डोक्यावर गंगा जल शिंपडून स्वतःला 'शुद्ध' करून घेतलं आहे. हुगळीच्या आरामबाग मतदारसंघाचे खासदार अपरुपा पोद्दार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचा तृणमूल प्रवेश घडवून आणला.