बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:50 IST)

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे पहिले आमंत्रण कोणाला ?

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे पहिले आमंत्रण पाठविण्यात आले  आहे. अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षाच्या इक्बाल अन्सारी यांना या रामजन्मभूमीचे पहिले आमंत्रण पाठविण्यात आले आहे. हे आमंत्रण त्यांना राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांनी पाठवले आहे. इक्बाल अन्सारीसह असलेल्या मुस्लिम पक्षाच्या हाजी मेहबूब यांनाही निमंत्रण देण्यात आले असून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या पद्मश्री मुहम्मद शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. 
 
इक्बाल अन्सारी म्हणाले की, रामजन्मभूमी पूजनाचे आमंत्रण मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे आणि या कार्यक्रमात ते नक्कीच सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, रामललाच्या भव्य मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने ही जागा दिली असून आता कोणताही वाद नाही. इक्बाल अन्सारी असेही म्हणाले की, ते नेहमीच संत आणि साधू यांच्या सहवासात राहिले असल्याने त्यांना रामबद्दल फार आदर आहे.