शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (09:43 IST)

म्हैसूर राजघराण्यात मुलाचा जन्म, घराणे शाप झाल्याची चर्चा

म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची अख्यायिका आहे. मात्र आता त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. 

म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याची शापातून मुक्तता झाली अशी चर्चा लोकांमध्ये आहे. तब्बल ४०० वर्षांनंतर राजा यदुवीर आणि त्रिशिका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह गेल्यावर्षी राजस्थानमधील डूंगपुरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत पार पडला.  यदुवीर यांनी बोस्टनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्रिशिका यांनीही अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. ऐतिहासिक आंबा विला पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह जूनमध्ये पार पडला.

 

राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनाही दत्तक घेण्यात आलं होतं. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांनी काही वर्षांपूर्वी यदुवीर यांना दत्तक घेतलं. त्यांनाही संतती नाही.