बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (16:12 IST)

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून प्लास्टिक बंदी होणारच आहे असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणार आहे. हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड केला जाणार आहे. सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला असून मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
 
या बंदी मध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत, चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक डब्बे, चमच, पिशवी, फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही. त्यामुळे प्लास्टिक वापरा दंड भरा अशी स्थिती आहे.