1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (14:02 IST)

होळीपूर्वी राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना योगी सरकारची मोठी भेट

yoginath
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने होळीपूर्वी राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 10 लाख राज्य कर्मचारी, 8 लाख शिक्षक आणि 12 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2024 पासून डीए वाढीचा लाभ मिळेल.
राज्य सरकारने वाढीव दराने महागाई भत्ता जाहीर केल्यामुळे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. जानेवारी 2024 पासून डीए वाढ मंजूर करण्यात आली आहे.

सुमारे 18 लाख कर्मचारी आणि 12 लाख पेन्शनधारकांना ही रक्कम त्यांच्या पगारासह मिळणार आहे. डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 314 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. याबाबतचा आदेश सरकारने सोमवारी जारी केला आहे. महागाई भत्ता वाढल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. होळीपूर्वी राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्याचे औपचारिक आदेश आज जारी होणार आहेत.
डीए 4 टक्क्यांनी वाढताच तो 50 टक्के होईल. याचा राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

Edited by - Priya Dixit