बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (10:59 IST)

छत्तीसगड मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 19 नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून येथे सुरक्षा दलाकडून एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन केले जात होते, त्यादरम्यान 19 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये 3 प्रमुख नक्षलवादी कमांडरचाही समावेश आहे.  
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या 19 नक्षलवाद्यांपैकी 3 कमांडरवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 
 
पोलिसांनी अटक केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या भागात नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम सातत्याने राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Edited By- Dhanashri Naik