Widgets Magazine

बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये 6 महिन्यानंतर बैठक

भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये शनिवारी क्षेत्रीय कमांडर स्तरावरची ध्वज बैठक झाली. सहा महिन्यांच्या खंडानंतर प्रथमच अशाप्रकारची बैठक झाली.
पाकिस्तानी सैनिक आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भारतीय हद्दीत सातत्याने मारा करतात. या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होत आहे. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी सीमेवर तैनात असणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सच्या विनंतीवरून बीएसएफचे अधिकारी ध्वज बैठकीत सहभागी झाले. या बैठकीमध्ये आयबीलगत शांतता अबाधित ठेवण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. अर्थात, चिथावणीखोर माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी रेंजर्सला दिला.


यावर अधिक वाचा :